शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (17:13 IST)

लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, कर्नाटक सरकारचा दावा

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली आहे, असा दावा कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांना केला. एसआयटीकडून या प्रकरणाचे पुरावे जमा करण्याचं काम सुरु आहे. त्यानंतर मारेकऱ्यांना अटक केली जाईल, असं कर्नाटक सरकारने म्हटलं आहे.

पोलिसांनी यापूर्वी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मारेकऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित मारेकरी स्पष्ट दिसत होता. या हल्ल्यामागे कोण आहे हे माहित आहे. मात्र ठोस पुरावे जमा केले जात आहेत. पुराव्यांशिवाय त्यांची नावं जाहीर केली जाऊ शकत नाहीत. पुरावे मिळताच मारेकऱ्यांना अटक केली जाईल, अशी माहिती रामलिंगा रेड्डी यांनी दिली.