1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (15:24 IST)

अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

priya variyar

मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रियाने दाखल केलेल्‍या याचिकेवर सुनावणी करत सुप्रीम कोर्टाने प्रिया आणि दिग्दर्शक उमर लुलू यांच्‍या विरोधात दाखल केलेल्‍या एफआयआरवर स्थगिती दिली आहे. प्रिया वारियर, उमर लुलू विरोधात कोणतीही कारवाई न करण्‍याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

प्रियाच्‍या 'ओरु आदर लव' या चित्रपटातील एका व्‍हायरल गाण्‍यामुळे हा वाद निर्माण झाला होता. व्‍हिडिओतील गाण्‍यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत प्रियाविरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. हैदराबादमधील काही मुस्लीम तरुणांनी प्रिया आणि चित्रपट निर्मात्याविरोधात ही तक्रार दाखल होती. प्रियाच्या व्हायरल झालेल्या गाण्यावर आक्षेप घेत गाण्यातून मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला होता.