testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आम्ही धर्माची दलाली करत नाही - राहुल गांधी

Last Modified शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (15:56 IST)

सोमनात मंदिर वाद सुरु करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली गेली मात्र हवा तसा परिणाम दिसला नाही.

सोमनाथ मंदिरात अहिंदू (Non-Hindu) म्हणून नोंद करण्यात आल्यामुळे चांगलेच चर्चेत आले. विरोधक
राहुल गांधींना या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता या वादात
राहुल गांधींचा व्हिडीओ समोर आला असून , यामध्ये विरोधकांना चोख उत्तर देत आहेत. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी सांगत आहेत की, माझी आजी आणि संपुर्ण कुटुंब शिवभक्त आहे. धर्म आणि देवा ही आपली सर्वांची खासगी गोष्ट असून त्याची दलाली कोणी करू नये असे म्हणताच गांधींच्या या वक्तव्यानंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवत दाद देत आहेत.
'आम्ही काही गोष्टींना खासगी ठेवण्यावर विश्वास ठेवतो. यासंबंधी आम्ही बोलत नाही. कारण आम्हाला वाटतं की, जो आमचा धर्म आहे तो आमची खासगी गोष्ट आहे, तो आमच्या आत आहे. यासाठी आम्हाला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. ही जी आमची गोष्ट आहे त्याचा आम्हाला ना व्यापार करायचा आहे, ना आमची दलाली करण्याची इच्छा आहे', असं राहुल गांधी व्हिडीओत समोर आले आहे. आता मात्र हा व्हिडियो फार व्हायरल झाला आहे.राहुल गांधी यांनी बुधवारी 29 नोव्हेंबरला गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट देत दर्शन घेतलं. गेल्या तीन महिन्यात 19 वेळा राहुल गांधींनी मंदिराला भेट दिली आहे. या नव्या व्हिडियो मुळे आता विरोधक अडचणीत येतील असे चित्र समोर येत आहे.यावर अधिक वाचा :