मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (10:48 IST)

म्हणे, भूतामुळे राजस्थानच्या विधानसभेत सदस्य संख्या टिकत नाही

आता राजस्थानच्या विधानसभेत भूत असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. त्यामुळे सभागृहात 200 सदस्यांची संख्या फार काळ टिकत नसल्यामुळे या अफवांचं पेव फुटलं आहे. कुठला आमदार तुरुंगात जातो, कधी कुणी राजीनामा देतं. सहा महिन्यांच्या कालावधीत दोन आमदारांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही आमदारांना अस्वस्थ वाटायला लागलं. आत्मा असल्यामुळे हे घडत असल्याचा गैरसमज आमदारांनी करुन घेतला आहे. काही आमदारांनी थेट मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. यज्ञ करुन भूतबाधा दूर करावी, असं साकडं यावेळी भाजप आमदारांनी घातलं. 
स्मशानभूमीच्या जागेवर विधानसभेची वास्तू उभारली आहे. त्यामुळे वाईट शक्तींचा वावर इथे आहे, म्हणून हे प्रकार घडत असल्याचा अंदाज आमदारांनी व्यक्त केला आहे. नाथद्वाराचे आमदार कल्याण सिंह यांचा उदयपूरमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर मंडलगडच्या आमदार कीर्ती कुमारी यांचं ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्लूने निधन झालं होतं. दोन्ही सत्ताधारी भाजपचे आमदार होते.


ज्योतीनगरमध्ये 16.96 एकरांवर पसरलेली राजस्थान विधानसभेची वास्तू ही देशातील आधुनिक विधीमंडळ इमारतींपैकी एक आहे. लाल कोठी स्मशानभूमी ही या इमारतीच्या जवळच आहे.