शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:23 IST)

स्टॅच्यु ऑफ युनिटी'चा जगातील आठ आश्चर्यांत समावेश

नर्मदेच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेला 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'  (Statue of Unity) पुतळ्याचा जगातील आठ आश्चर्यांत समावेश करण्यात आलाय. आठ देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशननं (SCO) 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'चा जगातील आठ आश्चर्यांपैंकी एक घोषीत केलंय. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या सदस्यांमध्ये भारत, पाकिस्तान, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तझाकिस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहेत.
 
मला हे सांगताना खूप आनंद होतोय की, अद्वितीय प्रतिमा असलेल्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'ला SCO च्या आठ आश्चर्यात सामिल करण्यात आलंय. या सन्मानामुळे नक्कीच पर्यटक इकडे अधिक आकर्षित होतील, असं ट्विट परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलंय.