1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (16:56 IST)

बीएसएनएल देणार दोन हजारात स्मार्टफोन

bsnl phone

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा  दोन हजार रुपयांचा स्मार्टफोन घेऊन येणार आहे. हा स्मार्टफोन साधारण महिन्याभरात बाजारात उतरण्यात येईल. अनेक उत्पादन कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बीएसएनएलबरोबर भागीदारी करण्यास मायक्रोमॅक्स आणि लावा यासारख्या भारतीय स्मार्टफोन कंपन्या इच्छुक आहेत. बीएसएनएलकडून ग्राहकांना व्हॉईस पॅक आणण्यात येणार आहे, असेही अनुपम श्रीवास्तव म्हणाले. याचबरोबर, या स्मार्टफोनमध्ये कोणत्या सुविधा असतील याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.