Samsung Galaxy S10 Lite चे प्री-बुकिंग जोरात सुरू

Samsung Galaxy S10 Lite हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनसाठी
फ्लिपकार्ट आणि Samsung.com वर प्री-बुकिंगलाही सुरूवात झाली असून तीन फेब्रुवारीपर्यंत बुकिंग करता येईल. मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये ‘सुपर स्टेडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला आहे. या टेक्नॉलॉजीसह आलेला हा भारतातील पहिलाच फोन असल्याचं कंपनीने म्हटलंय. या
स्मार्टफोनची किंमत 39 हजार 999 रुपये आहे.

प्री-बुकिंग ऑफरअंतर्गत युजर्सना 1,999 रुपयांमध्ये वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट फायदा मिळेल. लॉंच ऑफरअंतर्गत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 3,000 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे.

स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज मेमरी 1TB पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फुल HD+ सुपर AMOLED Infintiy-O डिस्प्ले आहे. याशिवाय यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 ऑक्टा-कोर प्रोसेसर असून 25W सुपर फास्ट चार्जरसह 4,500 mAh क्षमतेची बॅटरी दिलीये. अवघ्या 30 मिनिटांच्या सुपर फास्ट चार्जिंगनंतर फोनची बॅटरी दिवसभर टिकते असा कंपनीने दावा केला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये ऑन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे.
स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. म्हणजे फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेरे असून यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी ...

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला
उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे ...

शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ

शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ
शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना ...

तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, शिवप्रतिष्ठानचा इशारा

तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, शिवप्रतिष्ठानचा  इशारा
किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादात आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनीही उडी घेतली ...

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ
चीनमध्ये करोना विषाणूचे पडसाद आता भारतात जाणवत आहेत.चीनमधुन पुरवठा खंडीत झाल्याने भारतात ...