शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

कढई मटर

साहित्य : 1 कप मटरचे दाणे, 1/4 कप कांद्याची पेस्ट, 1/4 कप टोमॅटो पेस्ट, 1/4 कप दही, 1 लहान चमचा आलं पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कोथिंबीर चिरलेला, 1/2 लहान चमचा जिरं, 3-4 लवंगा, 6-7 काळे मिरे, 1 तुकडा दालचिनी, 2 तेजपान , 1/4 चमचा दही, 1 चमचा धने पूड, 1/4 चमचा तिखट, 1/4 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा तेल. 

कृती : कढईत तेल गरम करून त्यात जिरं, लवंग, काळे मिरे, दालचिनी व तेजपान टाकावे, नंतर त्यात आलं - कांद्याची पेस्ट घालून परतून घ्यावे, मग त्यात टोमॅटो पेस्ट घालावी. 2 मिनिटाने त्यात दही, मिरची, मटरचे दाणे, मीठ, हळद, धने पूड व तिखट घालून चांगले परतून घ्यावे. मटर शिजल्यावर कढई खाली उतरवून त्यात गरम मसाला व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.