शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

कॉर्न उपमा

साहित्य - 225 ग्रा. मक्याचे दाणे, हिरव्या-मिरच्या, मीठ, चवीपुरती साखर, 1 टी स्पू. लिंबूचा रस, हळद, 1/2 वाटी खवलेले नारळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, कढीपत्त्याची पानं, मोहरी, जिरे आणि हिंग. 

कृती - मक्याचे दाणे, हिरव्या मिरच्या, मीठ-साखर, लिंबाचा रस घालून मिक्सरमधून भरडून घ्या. मायक्रोवेव्हमधल्या काचेच्या भांड्यात थोडं तेल टाकून त्यात जिरे-मोहरी- चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, हिंग टाका, मायक्रोवेव्हमध्ये हायवर (100%) 10 सेकंद ठेवा. भांडं बाहेर काढून भरडलेलं मिश्रण त्यात टाकून चांगलं हलवून घ्या. भांड्यावर झाकण ठेवून परत मायक्रोवेव्हमध्ये हायवर (100%) ३-४ मिनिटे ठेवा, बाहेर काढून कोथिंबीर व खोवलेलं नारळ पेरा. कॉर्न उपमा तयार !