testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत

devendra fadnavis
मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर घडलेल्या चेंगरा चेंगरीच्या घटनेबद्दल यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आपल्याला या घटनेने धक्का बसला असून, या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली असून, त्यांना रुग्णालयात पोहोचण्याचे निर्देश आहेत.
या दुर्घटनेची महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून चौकशी केली जाईल तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


यावर अधिक वाचा :