testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पहिली कार्यकारणी जाहीर

ncp
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीची पहिली यादी आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या यादीत वयाचे निकष पाळून युवा कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारणीची दुसरी यादी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित पत्रकारांना माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या २२ जुलै या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसने "गाव तिथे राष्ट्रवादी शाखा" हे अभियान चालू केले होते. आदरणीय शरद पवार यांच्या १२ डिसेंबर या वाढदिवसापर्यंत राज्यभरात ५ हजार शाखा उघडल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येत्या काळात युवक संघटनेवर अधिक लक्ष देणार असून युवकांचे संघटन मजबूत करेल असेही ते म्हणाले.
यावेळी पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आणि डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :