रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (16:47 IST)

पुण्याचे बालगंधर्व पाडले जाणार, ऐतिहासिक महत्व, पुण्यातून विरोध

पुण्यातील ‘बालगंधर्व रंगमंदिर’ ही वास्तू म्हणजे पुण्याची मान , शान आणि पुणेकरांसाठी अभिमान आहे. शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचं स्थान असलेलं आणि सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेलं बालगंधर्व रंगमंदिर लवकरच मनपा पाडणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडल्यानंतर त्याठिकाणी बहुमजली, सोयी-सुविधांनी युक्त नवीन रंगमंदिर संकुल उभारले जाणार आहे. 
 
‘बालगंधर्व’च्या रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबधी आराखडे महापालिकेने वास्तुविशारदांकडून मागवले असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. नवीन रंगमंदिर उभारण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून अन्य आवश्यक प्रक्रियाही सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षांत अर्थात २०१९ मध्ये बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार आहे. नुकताच या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे आजवर पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आणि पुण्यातील अनेक पिढ्यांचं मनोरंजन करणाऱ्या ‘बालगंधर्व’च्या पर्वाचा अस्त होणार असंच म्हणावं लागणार आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी कलाकार, रंगकर्मी आणि प्रेक्षकांच्या सोयीचा विचार करून बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू साकारली होती. बालगंधर्व थिएटर तोडून त्याचा पुनर्विकास करण्याला पुणेकरांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. या वास्तूत बदल करवून बदल करवून तील न पाडता इतिहास जपावा असा सुरु उमटत आहे.