testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रखूमाईंच्या जयंतीनिमित्त खास गूगलचे डूडल

rukhmabai raut
रखूमाईंच्या १५३ व्या जयंतीनिमित्त हे खास गूगल डूडल बनवण्यात आले आहे. १८६४ साली जन्म झालेल्या रखूमाई या भारतातील पहिल्या प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टर होत्या. लग्नानंतर लंडनमध्ये जाऊन रखूमाई यांनी वैद्यकीय क्षेत्राचे उच्च शिक्षण घेतले आहे. १८९४ साली मुंबईतील कामा हॉस्पिटलमध्ये त्या प्रॅक्टिक्स करत होत्या.

११ व्या वर्षी रखूमाईंचे लग्न १९ वर्षीय दादाजी राऊत यांच्यासोबत झाले होते. मात्र लग्नानंतर त्यांनी नवर्‍याच्या घरी जाऊन राहण्यास नकार दिला. भारतात ब्रिटीशांचं साम्राज्य असताना त्यांनी बालविवाह आणि स्त्री वरील अन्यायाकारक प्रथांना वाचा फोडण्यासाठी लढा दिला. जबरदस्ती लावून दिलेल्या लग्नापेक्षा त्यांनी सहा महिने जेलमध्ये राहणं पसंत केले. त्यानंतर रखुमाईंनी घटस्फोट घेऊन शिक्षणाची कास घेतली. 'हिंदू लेडी' या टोपणनावाने डॉ. रखुमाईंनी 'टाईम्स ऑफ इंडिया' मध्ये लिहलेला लेख फारच गाजला होता. हिंदू प्रथा, परंपरा याच्यावर त्यांनी टीका केली होती. तसेच 'बालविवाह आणि कालांतराने त्यातून येणारं वैधव्य' हे स्त्रीयांसाठी कसं अन्यायकारक आहे. याबद्दल त्यांनी भूमिका मांडली होती.


यावर अधिक वाचा :