बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:03 IST)

सोनई हत्याकांड : 7 आरोपींपैकी 6 जणांना फाशी

अहमदनगरमधील सोनई हत्याकांडातीलएकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने  फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड दोषींकडून वसूल केल्यानंतर, त्यातील 10 हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.

दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23), संदीप राजू धनवार (वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) या सोनईतील गणेशवाडीत राहणाऱ्या तिघांची हत्या केली होती. तर प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांना फाशी सुनावण्यात आली आहे. सातवा आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला.