testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राफेल नदालची पुन्हा अग्रमानांकनावर झेप

पॅरिस| Last Modified मंगळवार, 22 ऑगस्ट 2017 (12:20 IST)
स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल दुखापतींनी अनेकदा त्रस्त केल्यामुळे कारकीर्द संपुष्टात येण्याच्या काठावरून परतला. इतकेच नव्हे तर तब्बल तीन वर्षांनंतर त्याने पुन्हा एकदा विश्‍वक्रमवारीत अग्रमानांकनावर झेप घेतली. परंतु या सगळ्यावर आपलाच विश्‍वास बसत नसल्याचे सांगून नदालने ही वाटचाल स्वप्नवत असल्याचे स्पष्ट केले.
नदालने या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकताना आपला 15वा ग्रॅंड स्लॅम मुकुट जिंकला.

पुरुष एकेरी विश्‍वक्रमवारी- 1) राफेल नदाल (स्पेन), 2) अँडी मरे (इंग्लंड), 3) रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), 4) स्टॅन वॉवरिन्का (स्वित्झर्लंड), 5) नोव्हाक जोकोविच (सर्बिया), 6) अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी), 7) मेरिन सिलिच (क्रोएशिया), 8) डॉमिनिक थिएम (ऑस्ट्रिया), 9) ग्रिगोर दिमित्रोव्हा (बल्गेरिया), 10) केई निशिकोरी (जपान), 11) मिलोस रावनिच (कॅनडा), 12) जो विल्फ्रेड त्सोंगा (फ्रान्स), 13) डेव्हिड गॉफिन (बेल्जियम), 14) जॉन इस्नर (अमेरिका), 15) रॉबर्टो बॉटिस्टा (स्पेन), 16) पाब्लो कॅरेनो (स्पेन), 17) जॅक सॉक (अमेरिका), 18) निक किरगियॉस (ऑस्ट्रेलिया), 19) टॉमस बर्डिच (झेक प्रजासत्ताक) व 20) लुकास पोईले (फ्रान्स).


यावर अधिक वाचा :