testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ताश्‍कंद ओपन टेनिस स्पर्धा; युकी- दिविज जोडी अंतिम फेरीत

ताश्‍कंद| Last Modified शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (09:58 IST)
भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांब्रीने भारताच्याच दिविज शरणच्या साथीत चमकदार विजयाची नोंद करताना एटीपी ताश्‍कंद ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
पुरुष दुहेरीतील उपान्त्य फेरीच्या सामन्यात युकी व दिविज या बिगरमानांकित जोडीने गुलेर्मो गार्सिया लोपेझ व एन्‍रिक लोपेझ या स्पॅनिश जोडीचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीवरून 3-6, 7-5, 10-6 असे मोडून काढताना अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी युकी-दिविज जोडीसमोर अंतिम फेरीत हॅन्स पॉडलिप्निक-आन्द्रेई व्हॅसिलेव्हस्की विरुद्ध जेम्स केरेटानी-मार्क पोलमन्स यांच्यातील विजयी जोडीचे आव्हान आहे.


यावर अधिक वाचा :