शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

मका पराठा

- किर्ती मोहरील

MHNEWS
साहित्य : २ वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमच्या आल्याची पेस्ट, १ चमचा लसणाची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, चवीनुसार तिखट, मीठ, हळद अंदाजे १/२ लहान चमचा ओवा, १ चमचा तीळ, शेकण्यासाठी तेल.

कृती : मक्याचे पीठ, बेसन, कणीक तिन्ही पीठ मिसळून घ्या. चवीनुसार तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, तीळ व आले पेस्ट घालून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्या. कोथिंबीर घाला. चांगले मळून लहान लहान आकारात गोळे बनवा. नंतर पराठे बनवून गरम तव्यावर शेकून घ्या. दही व लोण्यासोबत सर्व्ह करा.