तुळजाभवानी मंदिराला अनोखे रूप

tulja bhavani
तुळजापूर- महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक विद्यतरोषणाईमुळे तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार राजे शहाजी महाद्वार उजळून निघाले आहे. देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचा मंदिर परिसर आकर्षक विद्यतरोषणाईने उजळून निघाला आहे. भाविकांनी देवाचरणी अर्पण केलेल्या या अत्याधुनिक विद्युतरोषणाईमुळे मंदिर परिसराला अनोखे रूप मिळाले आहे.
नवरात्रीत दररोज लाखो भाविकांच्या उपस्थितीत महोत्सव होणार आहे. श्री तुळजाभवानी मातेचे पुणे येथील निस्सीमभक्त विजय उंडाळे यांनी ‍मंदिरावर ही आकर्षक विद्युतरोषणाई केली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आकर्षक विद्युतरोषणाई भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. डोळ्यांचे पारणे फिटतील अशा अनेक चित्रफीती या अत्याधुनिक एलईडी रोषणाईच्या माध्यमातून साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजे शहाजी महाद्वारासमोर आलेले भाविक थक्क होऊन जातात.
आठ दिवस न सुकणार्‍या देशी आणि विदेशी प्रजातीच्या मनमोहक फुलांची मंदिरातील गाभार्‍यासह परिसरात उंडाळे कुटुंबीयांमार्फक सजावट करण्यात येते.

मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी यंदा प्रथमच बारकोड असलेल्या दर्शन कार्डची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थानने अत्यंत सूक्ष्मपणे याचे नियोजन केले आहे. प्रत्येक भाविकाची त्यामुळे संगणकीय नोंद होणार आहे. त्यामुळे प्रतिदिवस किती भाविकांनी जगदंबेचे दर्शन घेतले याची अधिकृत आकडेवारीदेखील प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

मोबाईल हँग होण्यापासून कसे वाचवाल जाणून घ्या

मोबाईल हँग होण्यापासून कसे वाचवाल जाणून घ्या
आपण स्मार्टफोन वापरता तर आपल्या समोर फोन हँग होण्याच्या समस्या येतच असणार

वाचा , राज्यात लॉकडाऊन होणार का?

वाचा , राज्यात लॉकडाऊन होणार का?
राज्यातला वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता लवकरच राज्य सरकार १० दिवसांसाठी लॉकडाऊन करणार ...

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार
राज्यात जवळपास पाच महिन्यानंतर २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले ...

मालेगावात माजी आमदाराने घेतली जाहीर सभा, गुन्हा दाखल

मालेगावात माजी आमदाराने घेतली जाहीर सभा, गुन्हा दाखल
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर सभा घेणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई असताना

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथे ...