शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 जून 2019 (11:27 IST)

international yoga day: राशीनुसार योग केला तर मिळेल जीवनात यश

मेष राशी : मेष राशीचे जातक पूर्ण रूपेण गतिशील राहतात. यांच्या शरीरात ऊर्जेचे जास्तीत जास्त प्रयोग होतो. या राशीच्या व्यक्तींना गतिशील व्यायाम करायला पाहिजे. यांच्यासाठी जॉगिंगपासून डांस करणे फारच लाभदायक असते.
 
वृषभ राशी : वृषभ राशी असणारे जातक कोणत्याही कार्याला हळू हळू पण समजदारीने करणे पसंत करतात. या राशीचे लोक सुदृढ अंगकाठीचे असतात पण यांची पचन शक्ती फारच दुर्बळ असते. पुरुषांसाठी भार उचलणे आणि स्त्रियांसाठी जिम जाणे लाभकारी असते. यांच्यासाठी ध्यान योगा देखील फायदेशीर असते.
 
मिथुन राशी : मिथुन राशी असणारे जातक त्या पुरुषांपासून लवकर कंटाळतात ज्यांच्यात गती नसते. यांना सर्व काही फार लवकर करण्याची इच्छा असते. या लोकांसाठी पोहणे, टेबल टेनिस खेळणे उत्तम व्यायाम असतो.
 
कर्क राशी : कर्क राशीचे मनुष्य घरगुती असतात. हे व्यक्ती संकोची स्वभावाचे असतात. यांना ध्यान योगा, अनुलोम-विलोम आणि प्राणायाम करायला पाहिजे.
 
सिंह राशी : सिंह राशी असणार्‍या जातकांमध्ये स्पर्धेची भावना जबरदस्त असते. म्हणून यांना हृदयाशी संबंधित व्यायाम, योगा अवश्य करायला पाहिजे.
 
कन्या राशी : कन्या राशीचे जातक आपल्या आरोग्याकडे भरपूर लक्ष देतात. यांना व्यायाम करायला आवडत. यांच्यासाठी हलके आणि आरामदायक व्यायाम जसे नेमाने फिरणे लाभकारी साबीत होऊ शकत.
 
तुला राशी : या राशीचे लोकांना मित्रांसोबत व्यायाम करणे आवडत. जिम पासून पोहणे, धावणे, ध्यान आणि योगा यांच्यासाठी लाभकारी असते.
 
वृश्चिक राशी : या राशीचे लोक आपल्या बाह्य प्रवृत्तीमुळे स्वास्थ्य संबंधी कार्यक्रमांमध्ये भागीदार असतात. हे लोक मजा व दिखाव्यासाठी जीमजाणे पसंत करतात पण कोणते ही काम मन लावून करत नाही. यांना आपल्या ऊर्जेसाठी भरपूर खेळायला पाहिजे. यांना मार्शल आर्ट देखील शिकायला पाहिजे.
 
धनू राशी : या राशीचे लोक खेळात जास्त आवड ठेवतात. बॉक्सिंग, हॉकी यांचा आवडता खेळ आहे. यांना जॉगिंग आणि कराटे शिकणे आणि शिकवायला आवडत.
 
मकर राशी : या राशीचे लोक यथार्थवादी असतात. या राशीचे लोक टीम सोबत असो किंवा नसो त्यांना काहिच फरक पडत नाही. म्हणून यांचे आवडते खेळ टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग आहे.
 
कुंभ राशी : या राशीच्या लोकांना रोज काही नवीन करायचे असते. असे व्यक्ती पाणी किंवा वार्‍याचे खेळ खेळणे पसंत करतात. धावणे, रस्सी कूदने यांच्यासाठी फायदेशीर असते. 
 
मीन राशी : या राशीचे लोक पोहण्यात जास्त रुची घेतात. सकाळ संध्याकाळ फिरणे यांचा आवडता छंद आहे.