फेंगशुईच्या साधनांनी सजवा घर
|
अशावेळी घरात जास्त तोडफोड न करता फेंगशुईच्या साधनांचा वापर करून घराला अनकूल बनवू शकता. या साधनांचा वापर करून फेंगशुईची सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात आपण वाढ करू शकता. हे केल्याने आपल्या आर्थिक वैवाहिक समस्या, मुलांचे बिघडणारे आरोग्य, विनाकारण होणारी भांडणे, शेजार पाजार्यांशी होत असलेली धुसफूस यापैकी बर्याचशा समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल.
मासे, आरसा, क्रिस्टल, घंटी, बासरी, कासव, हॅपी मॅन, जीवन यान या फेंगशुई साधनांच्या सहाय्याने आपण घरात बदल करू शकता.
* तुमच्या घरात फिशटॅंक असेल तर सावधान. फिशटॅंक योग्य जागी असल्यास चांगलेच. त्यामुळे तुमच्यावर दैवी कृपा होईल. पण त्याची जागा चुकल्यास कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येईल. शिवाय दिवाळखोरी, मानसिक दडपण यांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
* फेंगशुई शास्त्रात डॉल्फिन मासा शुभ प्रतीक आहे. आपल्या घर व कार्यालयातील उत्तर किंवा आरोग्याशी संबंधित कोप-यात त्याला ठेवता येईल. आजार लवकर बरा होण्यासाठी व आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू नयेत यासाठी याची स्थापना करावी.
* मासे परीक्षेत यश, नोकरीत पदोन्नती आणि यशाचे प्रतीक आहेत.
|
* फेंगशुईतील नाणी धातू तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात व संपत्तीचे प्रतीक असतात. याचा वापर वाईट बाबींना व रोगराईला दूर ठेवण्यासाठी केला जातो.
* चीमध्ये एक अदृश्य शक्ती असते जी मनुष्य तथा वातावरणाला आपसांत जोडून ठेवते. याचा वापर करून आपल्या नशीबात बदल घडवू शकता.
* चीला ब्रह्मांडीय ऊर्जासुद्धा म्हणतात. ही मेंदू आणि पदार्थांना एकत्र करते. ही उर्जा चेंडूसारखी असते. नैसर्गिक चक्राला ती आपसांत जोडून ठेवते.
|
* विंड चाइमचा मधुर आवाज मनाला शांती देतो. दुःख दूर करतो. भय, तणाव व क्रोधाला दूर करतो. संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. ध्वनीची कंपने व आवाज तणाव व शरीरातील भावनात्मक अडचणींना दूर करून मनाला शांतता देतो. मन शांत राहिल्याने जागरूकता वाढते व आत्म्याशी संबंध मजबूत होतात. या प्रकारे विंड चाइम उपयुक्त ठरते.
तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनांतील अडचणींनी त्रस्त झाला असाल तर वर दिलेल्या फेंगशुई साधनांचा वापर करून फायदा घेऊ शकता.
