बेडरूमची रचना अशी कराल
|
|
बेडरूम शांत असावी. त्यातील दिवेही मंद असावेत. भिंतींचे रंगही भडक नसावेत. तेही डोळ्यांना शांतावणारे असावेत. दोनपेक्षा जास्त आरसे आणि भडक रंग ची ला उद्युक्त करतात. त्यामुळे ते टाळावे.
बेडच्या पायाशी आरसा नको. तसेच तो खिडकीच्या दिशेनेही नको. फेंगशुईच्या मते दिवाणखान्याच्या शेजारी बेडरूम असावी. बेडरूम हे पावित्र्य, नव्या संधी आणि प्रगतीची निदर्शक आहे. फेंगशुईमध्ये बेडरूमधील दारे, आरसे आणि बेड यांची योजना कशी केली आहे, याला महत्त्व आहे. बेडरूमचे दार उजव्या बाजूला पूर्णपणे उघडत असल्यास नव्या भरपूर संधींना आत येण्याची जागा आहे. दार पूर्णपणे उघडत नसल्यास संधींना येण्यात अडथळे आहेत. बेडरूममध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या आवडीची वस्तू, फोटो, फूल एखादे विधान समोर दिसेल असे ठेवावे. त्यामुळे आपणास प्रसन्न वाटते.
