महात्मा गांधी
| १८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला. तेथेच त्यांनी १९०३ मध्ये इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. १९१४ मध्ये ते भारतात परतले. १९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. १९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकर्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, १९४०-४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सार्यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले.
|

