संबंधित माहिती
- CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील स्पर्धा, सर्वांच्या नजरा धोनीवर
- MI vs LSG: 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सलग 8 वा पराभव, लखनौने 36 धावांनी सामना जिंकला
- MI vs LSG Playing XI: सचिनला मुंबईकडून वाढदिवसाचे हे गिफ्ट मिळणार, प्लेइंग 11 अशी असू शकते
- IPL 2022: कोलकाता आणि अहमदाबादमध्ये होणार प्लेऑफ सामने, 100% प्रेक्षक उपस्थित राहू शकतात, हे सामने लखनौमध्ये होणार
- RCB vs SRH ipl 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा लाजिरवाणा पराभव, हैदराबादने केवळ 8 षटकांत 69 धावांचे लक्ष्य गाठले
IPL 2022 : सलग आठ पराभवानंतर मुंबईचा कोच महेला जयवर्धने निराश, भासली सुधार करण्याची गरज
Mumbai Indians in IPL 2022 : मुंबई इंडियन्स संघाचा हेड कोच महेला जयवर्धने आयपीएल 2022 मध्ये आपल्या संघाच्या खराब प्रदर्शनामुळे निराश झाला असून यामागे खराब फलंदाजी मुख्य कारण असल्याचं सांगत आहे. तसेच फलंदाजांना स्वत:च्या कामगिरीचा विचार करुन समीक्षण करण्याचीही गरज असल्याचं देखील तो म्हणाला.
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. मुंबईच्या या पराभवानंतर कोच जयवर्धने म्हणाला, "मला फलंदाजांच्या कामगिरीचं समीक्षण करण्याची गरज आहे. कारण संघाने याआधी उत्तम प्रदर्शन केलं आहे. त्याच्या कामगिरीमुळेच पाच वेळा आयपीएलचा चषक उंचावला. मात्र आज फलंदाजांची खास कामगिरी न झाल्याने पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान गोलंदाजीतही काही सुधार करण्याची गरज असल्याचे त्याने म्हटले.
पुढील लेख
