आयपीएल सामन्यात दोनजण जखमी
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कोलकाता नाइट राइडर्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यात आज सुरू असलेल्या सामन्यादरम्यान दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
डेक्कन चार्जर्सच्या एंड्रयू सायमंड्ने मारलेला एका शॉटनंतर चेंडू 32 वर्षीय बाबू कामत यांच्या डोळ्याच्या वरच्या भागावर लागला. त्यामुळे कामत गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त सुब्रत नारायण यांनी दिली. त्याच्यावर उपचार चालू आहेत.
दुसर्या घटनेत बॉलीवूड स्टार शाहरूख खानला पाहण्याचा प्रयत्न करत असताना मोहम्मद सेलिम नावाचा व्यक्ती स्टँडवरून खाली झोक गेल्यामुळे पडला. त्याच्या पायाला जखम झाली असून उपचारासाठी त्याला तत्काळ कोलकाता राष्ट्रीय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.