भारताने कसोटी मालिका 4-0 ने जिंकली
पाचव्या कसोटीत इंग्लंडला एक डाव आणि 75 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेवर 4-0 अशा दणदणीत विजय मिळविला. करुण नायरच्या त्रिशतकी कारनामा आणि शेवटच्या दिवशी सर जडेजाने घेतलेल्या सात बळींच्या जोरावर भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 207 धावांतच गुंडाळला आणि सामन्यातील नऊ षटके शिल्लक असताना विजय मिळविला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीयं संघाने प्रथमच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-0 अशा फरकाने जिंकली. एका डावात 400 हून अधिक धावा फटकावल्यानंतरही संघाला पराभूत व्हावे लागण्याचा प्रसंग कसोटी क्रिकेटमध्ये चार वेळा घडला आहे. मात्र एकाच मालिकेत डावात चारशेहून अधिक धावा फटकावूनही दोनवेळा डावाने पराभूत होण्याची नामुष्की इंग्लंडवर ओढवली.