1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

आयपीएल 4: 8 तारखेपासून बोली

आयपीएल 4 8 तारखेपासून बोली
आयपीएल सीझन चारसाठी आठ व नऊ जानेवारी रोजी बोली लावली जाणार आहे. आयपीएल तीनमध्ये झालेल्या भ्रष्टाचारानंतर आता चारवर सार्‍यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

पंजाब व राजस्थान रॉयल्स संघाचा मालकी हक्क रद्द करण्‍यात आला आहे. दुसरीकडे पुणे व कोची संघाच्या अस्तीत्वाचा निर्णयही यादरम्यान होणार असल्याने या बोलीत कोण कोणता संघ घेतो याकडे सार्‍यांचे लक्ष आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने या संदर्भात घोषणा केली असून, खेळाडूंसाठी आठ व नऊ जानेवारीला बोली लावली जाणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव एन श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा