नाईट रायडर्सचा सरळ विजय!
ईडन गार्डन मैदानावर काल झालेल्या आयपीएल स्पर्धेत लक्ष्मीपती बालाजी आणि बांगलादेशचा शकिब अल हसन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी राजस्थान रॉयल्सवर आठ गडी राखून विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला शतकही गाठता आले नाही. बालाजी आणि हसन यांच्या गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 15.2 षटकांत अवघ्या 81 धावांत आटोपला. बांगलादेशचा दौरा गाजविणाऱ्या शेन वॅटसनला सलामीला पाठविल्यानंतरही त्याचा फायदा झाला नाही. अलोक मनेरियाने (21) केलेल्या धावाच त्यांच्या डावात सर्वाधिक ठरल्या. अभिषेक राऊत (11), अमित पौनिकर (15) आणि वॅटसन (11) या चार फलंदाजांखेरीज त्यांचा अन्य एकही फलंदाज दोन आकडी मजल मारू शकला नाही. त्यांचे अखेरचे पाच फलंदाज चौदा धावांत तंबूत परतले. बालाजीने पंधरा धावांत 3 गडी बाद केले. शकिब अल हसन याने 21 धावांत दोन गडी बाद करून त्याला सुरेख साथ केली.