1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

बंगळूरचा सलग पाचवा विजय!

दोन दिवसांपूर्वी डेक्कन चार्जर्सला उद्धवस्त करणारे ख्रिस गेल नावाचे वादळाने कोची टस्कर्सवर आदळल्यामुळे टस्कर्सला पराभवाचा सामना करावा लागला. 16 चेंडूत 44 धावा काढत बंगळूरला 13.1 षटकात विजय मिळवून दिला आणि रॉयल चॅलेंजर्सला गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर नेले.

विजयासाठी 126 धावांचे आव्हान घेत दिलशान आणि गेल जोडी मैदानात उतरली आणि कोचीच्या गोलंदाजांना तुडवले. दिलशानने रमेश पोवारच्या दुसर्‍या षटकात 20 धावा काढल्यानंतर गेलने परमेश्वरनला धावा करणे भाग पाडले. त्याच्या तिसर्‍या षटकात 37 धावा काढल्या आणि आयपीएलमधील सर्वांत वेगवान भागीदारीचा विक्रमही नोंदविला. या षटकाच्या अखेरीस बंगळूरच्या 67 धावा फलकावर लागल्या होत्या. विनयकमारने मलिंगा स्टाईल चेंडू टाकून गेलची दांडी उडवली. आयपीएलमधील 17 चेंडूत अर्धशतकचा गिलख्रिस्टचा विक्रम मात्रो तो मोडू शकला नाही.


About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा