दक्षिण भारतातील रांगोळीची परंपरा
|
आकाराने मोठी होण्यासोबतच रांगोळी सौंदर्यातही भर पडत जाते. ज्या फुलांच्या पाकळ्या लवकर वाळत नाहीत अशाच फुलांचा उपयोग रांगोळी सजविण्यासाठी केला जातो. यात गुलाब, चमेली, मेरीगोल्ड या फुलांचा प्रामुख्याने वापर केला जातो. मोठ्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर रांगोळी सजविताना केला जातो. रांगोळीचे किनारे पूर्ण फुलांनी सजविले जातात. कलाकार फुलांचा उपयोग करताना कोणतीही चूक केली जात नाही. कारण निसर्गाच्या या अनमोल ठेवीतच एक कलाकार स्वत:ची कला फुलवतो. ओणमच्या दरम्यान सजविण्यात येणार्या या रांगोळीत विशिष्ट रूपाने विष्णूचे पाय चित्रित केले जातात.
दक्षिण भारतातील इतर राज्यात म्हणजे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात रांगोळी 'कोलम' या नावाने सजविले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी सजविण्यात येणार्या कोलममध्ये जरी थोडेफार अंतर असले तरी त्यामागील मूळ अर्थ मात्र एकसारखाच असतो. कोलम हे सममितीय आकारांमध्ये सजविले जाते. यासाठी तांदळाच्या पिठाचा उपयोग केला जातो. तांदळाची कणिक वापरण्यामागे त्याचे सहज उपलब्ध होणे यासोबतच मुंग्यांना खाऊ घालणे हा उद्देश असतो.
|
या तर्हेचे चित्रांकन पोंगल व संक्रांतीला केले जाते. बाजारात कोलम सजविण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध असतात. या पुस्तकांच्या सहाय्यांने कोलममध्ये अनेक रंग भरले जातात.
