विश्व साहित्य संमेलन अंदमानमध्ये
पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आणि आॅफबीट डेस्टिनेशन या संस्थेच्या वतीने चौथे विश्व साहित्य संमेलन आॅक्टोबरमध्ये अंदमान येथे आयोजित करण्याची घोषणा महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी केली.
संमेलन आयोजित करण्यासाठी इच्छुक असल्याचा प्रस्ताव शिवसंघ प्रतिष्ठान आणि आॅफबीट डेस्टिनेशन यांनी दिला होता. मात्र, शिवसंघ प्रतिष्ठानने निवास आणि येण्याजाण्याचा खर्च उचलण्यास नकार दिला; मात्र आॅफबीट डेस्टिनेशनने हा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शविली.
दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वीकारण्यास ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी नकार दिला आहे. तरीही त्यांना आग्रह करण्यात आला.
मात्र वैयक्तिक कारणास्तव नकार दिल्याने आता संमेलनाध्यक्षाची पुन्हा नव्याने निवड केली जाणार असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी स्पष्ट केले.