परदेशात शिक्षण- तारेवरील कसरत
-राहुल मिश्रा
करियरसाठी मी काहीही करायला तयार आहे, असे आपण सहज म्हणून जातो. परंतु, तोंडातून वाफ सोडण्याइतके सोपे नाही. त्यात परदेशात उच्च शिक्षण घेणे म्हणजे तारेवरील कसरत आहे. एक आव्हान म्हणूनच ते आपल्याला स्वीकारावे लागते. आपल्या देशात शिक्षणाचे स्रोत खूप आहेत. परंतु, इतर विकसित राष्ट्राच्या तुलनेत आपण खूप मागे आहोत. उत्तम करियर करण्यासाठी परदेशात जाणार्या विद्यार्थ्यांच्या मागे कदाचित हेच एकमेव कारण असावे. मात्र, परदेशातील नामांकीत विद्यापीठे अथवा महाविद्यालयांत पदवी मिळवणे साधी गोष्ट नाही. परदेशातील महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी आधी स्वत:ला सिध्द करावे लागले. आपल्यातील पात्रता दाखवावी लागते. परदेशातील महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असून विद्यार्थ्यांना विविध परीक्षांच्या माध्यामातून वाटचाल करावी लागते.परदेशात शिक्षण घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी इंग्रजीचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. इंग्रजी शिकण्याची पहिली पायरी इंग्रजी व्याकरण आहे. विद्यार्थ्यांनी दररोज इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन व इंग्रजी बातम्या ऐकल्या पाहिजेत. तसेच मित्राशी इंग्रजीतून संभाषण केले पाहिजे. सेट- अमेरिकेतील प्रतिष्ठित महाविद्यालये व विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी स्कॉलिस्टिक एप्टीट्यूड टेस्टचे (सेट) आयोजन केले जाते. जगातील सगळ्यात मोठी निमसरकारी परीक्षा संस्था ईटीएसच्या वतीने (एजुकेशनल टेस्टिंग सर्विस) ही परीक्षा घेण्यात येते. परिक्षेच्या माध्यमातून आपली आकलन क्षमता, पात्रता तपासली जात असते. सेट परीक्षा दहा भागात विभागली जात असते. सेट परिक्षेत यश मिळवण्यासाठी आपल्याकडे लेखन व वाचनाची कौशल्य असणे आवश्यक असते. जीआरई- यूएसमधील विद्यालय तसेच महाविद्यालयात ग्रॅज्यूएट रिकॉर्ड एक्झामिनेशनमधील (जीआरई) गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. जीआरई या परिक्षेचे स्वरूप सेट परीक्षेप्रमाणेच असते. जीआरई ही संगणकावर आधारीत आहे. एमकॅट-नार्थ अमेरिकन यूनिवर्सिटीसारख्या अमेरिकेच्या उच्चस्तरीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी मेडिकल कॉलेज एडमिशन टेस्ट (एएएमसी) अर्थात एमकॅट घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यामधील मानसिक कुशलता तपासली जात असते. एमकॅट ही वर्षातून दोन वेळा घेतली जाते. पहिली एप्रिल तर दूसरी ऑगस्टमध्ये घेतली जाते. पीकॅट- अमेरिकेतील फार्मसी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्याना फार्मसी कॉलेज एडमिशन टेस्टचा (पीकॅट) सामना करावा लागतो. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यामधील कुशलता व साइंटफिक अनुभव तपासला जात असतो. परीक्षेत एक वैद्यकीय विषयावरील निबंध व वेद्यकीय क्षेत्राशी संबंधित 300 प्रश्नाची उत्तरे द्यावी लागत असतात.
एएसबीपी- आपल्याला यूएसमधील आर्मीमध्ये करियर करायचे असेल तर एएसबीपी टेस्टला सामोरे जावे लागते. मल्टी एप्टीट्यूड टेस्ट यूनाइटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ डिफेंसद्वारा ही आयोजित केली जात असते. टोइक- टेस्ट ऑफ इंग्लिश फॉर इंटरनॅशनल कम्युनिकेशन (टोइक) ही परीक्षा इंग्रजी भाषेवर आधारित असते. जगभरातील चाळीस लाखापेक्षा जास्त बिझिनेस इन्स्टीट्यूट इंग्रजी भाषेची परीक्षा घेण्यासाठी टोइकचा उपयोग करत असतात. परीक्षेत कॉर्पोरेट डेव्हलपमेंट, फायनान्स, प्रॉपर्टी, मॅन्युफॅक्चरिंग, परचेजिंग, ऑफिस, पर्सनल, टेक्निकल, हेल्थ व बिझिनेस आदी विषयांवर प्रश्न विचारले जात असतात. टोइकमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला विविध क्षेत्रातील ज्ञान आवश्यक असते. अमेरिकेतील विविध क्षेत्रातील माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हॉईस ऑफ अमेरिका, सीएनएन स्काय न्यूज, बीबीसी चॅनल, दि हिन्दू, इंडियन एक्सप्रेस अशा माध्यमाचा उपयोग केला पाहिजे. तसेच इंटरनेटचाही वापर केला पाहिजे. टॉफेल- अमेरिका व कॅनडा येथील विद्यापीठ व महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी टेस्ट ऑफ इंग्लिश एज ए फॉरेन लॅग्वेज (टॉफेल) द्यावी लागते. आता अनेक देशात ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाते. त्यासाठी आपल्याला कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे. टॉफेल ही परीक्षा रीडिंग, लिसनिंग व राइटिंग या तीन टप्प्यात घेतली जाते. तीनही टप्प्यात यशस्वी होण्यासाठी आपले इंग्रजी शब्दकोशीय ज्ञान विस्तृत असायला पाहिजे.जीमॅट-बिझिनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी ग्रॅज्यूएट मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट (जीमॅट) द्यावी लागत असते. कमीत कमी एक हजार मॅनेजमेंट प्रोग्राम आहेत, त्यात प्राविण्य दाखवावे लागत असते. परदेशात उच्च शिक्षण घेऊन करियर साकारणे ही खरंच तारेवरील कसरतच असते. आत्मविश्वास व अभ्यासाच्या जोरावर आपण जटील गोष्टीही सोप्या करून दाखवू शकतो