1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. स्वतःला घडवताना

बीपीओसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम

बीपीओ उद्योगाचा झपाट्याने विकास होत असून यात करियर करणार्‍यास इच्छूक असणाण्या विद्यार्थ्यांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) बीपीओवर आधारित सहा महिन्यांचा विशेष ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

इग्नूच्या या ऑनलाइन अभ्यासक्रमाला वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांकडून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रयोगशाळेची व्यवस्था करून दिली जाणार आहे. नॅशनल एसोसिएशन ऑफ सॉफ्टवेयर अ‍ॅण्ड सर्विस कंपनीनुसार (नॅस्कॉम) भारतात बीपीओ उद्योग क्षेत्रात 11 लाखपेक्षा अधिक लोक काम करताहेत. बीपीओ उद्योगात 2010 पर्यंत 25 ते 30 लाख लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा