1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

सचिनच फलंदाजीतील 'बादशाह'

सचिनच फलंदाजीतील बादशाह
विषय परिस्थितीत फलंदाजी करणार्‍या फलंदाजांमध्ये सचिनच बादशाह आहे, असे मत भारतीय खेळाडू किंवा भारतीय जनतेने मांडले नाही, तर न्यूझीलंडच्या माजी फलंदाजांनी एका पाहणीत मांडले आहे. सचिनच फलंदाजीतील 'बादशाह' असल्याचे सत्य मांडून ऑस्ट्रेलियाचा खेळाडूंना सनसनीट चपराक न्यूझीलंडने लावली आहे.

ऑस्ट्रेलियातील 'दि एज' दैनिकाच्या वतीने नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी करारबद्ध असलेल्या पंचवीस क्रिकेटपटूंना महान फलंदाज कोण, असा प्रश्‍न विचारला होता. यावर करारबद्ध असणार्‍या एकाही खेळाडूने सचिनला मत दिले नाही. त्यांनी पीटरसनला यासाठी पसंती दिली. ऑस्ट्रेलियाच्या या कावेबाजपणास न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सनसनीट उत्तर दिले आहे.

न्यूझीलंडमधील 'हेरॉल्ड ऑन संडे' या वृत्तपत्राने माजी क्रिकेट खेळाड़ंना जगातील सर्वात्कृष्ट फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी न्यूझीलंडमधील बहुतांशी खेळाडूंनी सचिन तेंडुलकर आजच्या पिढीतील सर्वात यशस्वी फलंदाज असल्याचे म्हटले आहे. सचिनने ज्या परिस्थितीत फलंदाजी केली आहे, त्याचे कौतून न्यूझीलंडच्या माजी फलंदाजांनी केले आहे.

न्यूझीलंडचा जॉन मारिसन म्हणाला की, सचिन जगातील संपन्न फलंदाज आहे. त्याच्या भात्यात अनेक प्रकारचे शॉट आहेत. परंतु पूर्वी ज्या मनसोक्तपणे तो खेळत होता, आता तसा खेळत नाही. सचिन कोणत्याही खेळपट्टीवर फलंदाजी करु शकतो, असे मारिसन याने सांगितले.

न्यूझीलंडचा फिरकीपटू दीपक पटेल याने सांगितले की, सध्या मला गौतम गंभीर आणि ग्रीम स्मिथ आवडतो. परंतु सर्वकालीन महान फलंदाज म्हणून सचिनशिवाय मी दुसर्‍याचे नावच घेवू शकत नाही. सचिन सामना वाचविण्यासाठी फलंदाजी करु शकतो, तशीच विजयासाठीही करु शकतो, असे पटेलने सांगितले.