testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एकता कपूर आणि सनीचे फिस्कटले

sunny leone
पॉर्नस्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओन आता बॉलीवूडची बेबी डॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सनी लिओनीने बघता बघता मनोरंजन विश्वासत आपले वेगळे स्थान निर्माण केले. पूजा भट्टच्या जिस्म 2 चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असले तरी एकता कपूरच्या चित्रपटानेच तिला खरी ओळख मिळाली.
तिचे यातील बेबी डॉल हे गाणे खूपच गाजले होते. एकता आणि सनीमध्ये तेव्हापासून मैत्री झाली. सध्या आपल्या आगामी रागिनी एमएमएस रिटर्न्स या वेब ‍सीरिजच्या लाँचवर लक्ष देत आहे. दरम्यान, सनीने या वेब सीरिजमध्ये कोणत्याही प्रकारे काम करावे, अशी अपेक्षा तिची होती. वेब सीरिजशी तिचे नाव प्रसिद्धी कार्यक्रम किंवा पाहुणी कलाकार म्हणून का होईना, जोडले जावे असे एकताला वाटत होते. पण एकताला सनीने नकार दिल्यामुळे एकता चांगलीच रागावली आहे.
सनीमुळे इव्हेंटमध्ये जरा ग्लॅमर येईल असा एकताचा विचार होता. पण काही वैयक्तिक कामे असल्यामुळे सनीने यावेळी आपल्या मैत्रिणीची मदत करू शकत नसल्याचे कळते. नुकतीच लॉस एं‍जेलिसला सनी गेली असून तिथे ती स्वत:च्या निर्मितीसंस्थेवर काम करत असल्यामुळे ती दोन महिने व्यस्त असणार आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकताला सनीच्या निर्णयामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला. सनीच्या करिअरमधील रागिनी एमएमएस 2 हा महत्त्वाकांक्षी चित्रपट होता. तिने एकताबद्दल असलेल्या निष्ठेप्रती तरी निदान स्वत:चे काम बाजूला ठेवायला हवे होते.


यावर अधिक वाचा :

'चिट्टी' निघाला चीनला

national news
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...

'केदारनाथ' ला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर सिनेमा 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाकडून ...

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

national news
गायक मिका सिंगला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दुबईत अटक करण्यात आली आहे. मुराक्काबात पोलीस ...

धमाल... दोन सुपरस्टार्स अमिताभ- शाहरुख पुन्हा सोबत

national news
बॉलीवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पर्‍यादवर सोबत ...

प्रियंका-निकच्या रिसेप्शनला मोदींनी लावली हजेरी, दंपतीला ...

national news
शाही विवाह सोहळ्यानंतर प्रियंका चोप्रा आणि निक जॉनास यांनी दिल्ली येथे रिसेप्शन आयोजित ...