1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

टोमॅटोची लाल चटणी

tomato chatani
साहित्य : दोन मोठे टोमॅटो, पाव कप साखर, दोन ते तीन खजूर, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आल्याचा कीस, पाच ते सहा मनुका.

कृती : प्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवून परतणे. परतताना मिश्रणाला पाणी सुटत आले की, लगेचच त्यात आलं, साखर, तिखट, मीठ, गरम मसाला, मनुका घालून मिश्रण एकजीव करणे. चटणीसारखा गोळा झाला की, गॅस बंद करणे. थंड झाल्यावर बाऊलमध्ये काढणे. अवघ्या पाच मिनिटांत चटणी तयार होते.