testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

व्हॉट्सअॅपमुळे वाचले तिचे प्राण

diana
मेक्सिको- गेल्या मंगळवारी मेक्सिको सिटीमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात जळपास 300 नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र ढिगार्‍याखाली अडकलेल्या एका महिलेचा जीव व्हॉट्सअॅपमुळे वाचला आहे. गंगळवारी आलेल्या या भूकंपामुळे डायना पचेको यांच्या ऑफिसची बिल्डिंग कोसळली. त्यामुळे डायना ढिगार्‍याखाली दबली गेली. ढिगार्‍याखाली अडकलेल्या डायनाने मदतीसाठी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअॅप मेसेज केले.
पण, सिग्नल नसल्याने मेसेज डिलिव्हर झाले नाहीद. भूकंप झाल्याच्या दुसर्‍या दिवशी डायनाच्या पतीला एक व्हॉट्सअॅप मेसेज आला आरि तो मेसेज होता डायनाचा. या मेसेजमध्ये डायनाने आपण अडकलेल्या ठिकाणाचे लोकेशन सांगितले होते. तसेच आपल्यासोबत इतरही सहकारी अडकल्याचे डायनाने मेसेजमध्ये म्हटले होते.

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत डायनाचे पती गार्सिया यांनी सांगितले की माझ्या पत्नीचा मला मेसेज आला आणि हा कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. भूकंप झाल्यानंतर डायना कुठे आहे याची माहिती नसताना मी केवळ प्रार्थनाच करत होतो. पण डायनाचा मला व्हॉट्सअॅप मेसेज आला आणि त्यानंतर तिच्यासोबत इतरांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.
डायनाने सांगितले की ज्यावेळी ती ढिगार्‍याखाली अडकली होती त्यावेळी बचाव पथकाचा तिला आवाज ऐकायला येत होता. आम्ही मदतीसाठी आवाज देत होतो मात्र त्यांना ऐकायला जात नव्हते. मग मी व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेज केले आणि सुदैवाने माझ्या पतीला माझा मेसेज मिळाला.


यावर अधिक वाचा :