शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

शारीरिक कष्ट कमी करतात नैराश्याचा धोका

व्यायामामुळे नैराश्याचा धोका कमी होत असल्याचा दावा एका ताज्या अध्ययनातून करण्यात आला आहे. ब्रिटनमधील लंडन किंग्ज युनिव्हर्सिटीच्या शस्त्रज्ञांनी विविध 49 अध्ययनांतून समोर आलेल्या माहितीचे विश्र्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. व्यायाम केल्यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो का, हे जाणून घेण्यासाठी या अध्ययनात मानसिकदृष्ट्या निरोगी 26 हजारांपेक्षा जास्त लोकांचा समावेश करण्यात आला होता. यात 47 टक्के पुरुषांचा समावेश असून त्यांचा सरासरी 7.4 वर्षे अभ्यास करण्यात आला. माहितीचे विश्र्लेषण केल्यानंतर व्यायाम न करणार्‍या लोकांच्या तुलनेत नियमि व्यायाम करणार्‍या लोकांमध्ये भविष्यात नैराश्य विकसित होण्याची शक्यता कमी असते. विविध वेगवेगळी भौगोलिक परिस्थितीतील तरुण आणि वृद्धांमध्ये नैराश्य आल्यास व्यायामाचा त्यावर संरक्षणात्मक परिणाम होतो. नियमित व्यायाम केल्यामुळे लोकांमध्ये नैराश्य विकसित होण्याचा धोका कमी होतो, हे जाणून घेण्यासाठी प्रथमच अशा प्रकारचे मेटा-विश्र्लेषण करण्यात आले आहे, असे ब्राझीलमधील ला सॅले विद्यापीठातील फेलिप बॅरेटो शूच यांनी सांगितले.