बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

टिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा

प्रत्येक महिलेसाठी सर्वात महत्त्वाचे सुख म्हणजे तिचे आई होणे असते. गर्भावस्थे दरम्यान आईच्या आरोग्याचा प्रभाव होणार्‍या बाळावर देखील पडतो. म्हणून या काळात मातेला आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. खानपानाशिवाय बर्‍याच अशा गोष्टी आहेत ज्या गर्भस्थ शिशुवर प्रभाव टाकते. आम्ही तुम्हाला अशा काही खास गोष्टी सांगत आहोत ज्या गर्भावस्थादरम्यान प्रत्येक आईसाठी उपयोग ठरेल.  
 
1. गर्भधारणाच्या वेळेस प्रत्येक आईला ब्लड ग्रुप, विशेषकर आर. एच फैक्टरची चाचणी करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय हीमोग्लोबिनची देखील चाचणी वेळो वेळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करायला पाहिजे.  
2. जर तुम्ही आधीपासुनच एखाद्या आजारपणाचे शिकार असाल जसे - मधुमेह, उच्च रक्तचाप इत्यादी तर गर्भावस्था दरम्यान नेमाने औषध घेउन या आजारांवर नियंत्रण ठेवावे. या बाबतीत आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.  
3. गर्भावस्थेच्या प्रारंभिक दिवसांमध्ये जीव घाबरणे, उलट्या होणे, रक्तदाब सारख्या समस्या असू शकता, अशात डॉक्टरकडून चेकअप जरून करवून घ्यावा. गर्भावस्थे दरम्यान पोटात दुखणे आणि योनीतून रक्तस्राव सुरू झाल्यास तर त्याच्याकडे गंभीरतेने बघावे आणि त्वरीत डॉक्टरांची भेट घ्यावी.  
4. गर्भावस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्या बिना कुठलेही औषध घेऊ नये. गर्भावस्थे लागणारे आवश्यक इंजक्शन घ्यावे आणि आयरनच्यांचे सेवन केले पाहिजे. चेहरा किंवा हात-पायात येणारी असामान्य सूज, डोकेदुखी, डोळ्यातून धुंधला दिखना आणि मूत्र त्याग करताना अडचण येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.  
5. गर्भधारणाच्या दरम्यान निर्धारित कॅलोरी आणि पौष्टिक आहार घेणे फारच गरजेचे आहे, जसे धान्य, भाज्या, फळ, बगैर फॅट्सचे मटण,  कमी वसेयुक्त दुध, नारळ पाणी इत्यादी.  
6. गर्भावस्थेत जास्त प्रमाणात फोलिक एसिड, आयरन, कॅल्शियम, विटामिन ए आणि बी-12 असणार्‍या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.   गर्भावस्थेत पर्याप्त मात्रेत पाणी प्यायला पाहिजे.  
7. तैलीय पदार्थांचे सेवन  कमी करायला पाहिजे. गर्भावस्थेत सिगारेट आणि दारू सारख्‍या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. या दरम्यान जूस, सलाड, सूप इत्यादि तरळ पदार्थांचे सेवन अधिक मात्रेत करायला पाहिजे.   
8. गर्भावस्थेत हलके आणि ढगळे कपडे घालायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचे शारीरिक जोखिम असलेले कार्य करू नये, तसेच भारी सामान देखील उचलताना सावधगिरी बाळगावी.  
9. हे सर्व टीप्स सामान्य गर्भावस्‍थेसाठी सांगण्यात आले आहेत. या बाबतीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.