शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

ताकाचे 13 फायदे

उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
 
वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो. 
 
उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे.


 

सकाळ- संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.
 
वारंवार उचकी येत असल्यास ताकात एक चमचा सुंठ चूर्ण मिसळून सेवन केले पाहिजे. 
मळमळणे, उलटी येणे असे लक्षण असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.

सौंदर्य समस्यांसाठी ताक हे फायद्याचे आहे. ताकात आटा मिसळून तयार केलेलं लेप त्वचेवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
 
गुलाबाचे रूट दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप चेहर्‍यावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात.

 
जर आपण अती ताण सहन करत असला तर नियमित ताकाचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य राहील. याने शरीरासह डोक्यातील उष्णातही कमी होते.

शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो.
 
खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावा. काही वेळाने स्नान करा. खाजेपासून मुक्ती मिळेल.
विष सेवन केलेल्याला वारंवार फिकट ताक पाजल्याने लाभ होतो. विषारी किड्याने चावल्यास ताकात तंबाखू मिसळून लावल्याने आराम होतो. तरी डॉक्टराची सल्ला घेणे योग्य.
 
टाचा फाटल्यास ताक काढण्यावर निघणारं लोणी लावायला हवं.