नवतपा: या 9 दिवसात काय खावे काय नाही जाणून घ्या

summer diet
Last Modified मंगळवार, 26 मे 2020 (22:16 IST)
मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात सूर्य पृथ्वीच्या अगदी जवळ येतो ज्यामुळे प्रचंड उन्हाळा जाणवतो. ह्यालाच नवतपा म्हणतात. या दिवसात उन्हात बाहेर निघण्या पासून वाचण्या व्यतिरिक्त आपल्याला खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावयाला हवी. नाहीतर आपल्याला आजारी पडायला वेळ लागणार नाही. चला मग जाणून घेऊया की नवतपा मध्ये आपला आहार कसा असला पाहिजे आणि काय खाणं टाळावं.
1 उन्हाळ्यात येणाऱ्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतात. त्यासाठी फळे भरपूर खावे.

2 कलिंगड, खरबूज, काकडी हे नियमाने खाल्ल्याने शरीरात पाण्याबरोबरच खनिज लवणांची कमतरता दूर होते.

3 या दिवसात वरण, भात, भाजी, पोळी खाणे चांगले राहते. उन्हाळ्यात भुकेपेक्षा कमीच खाणे चांगले असतं. जेणे करून आपल्या अन्नाचे पचन पण व्यवस्थित होईल आणि शरीर टवटवीत राहील. तळलेल्या वस्तू जास्त प्रमाणात खाऊ नये. अन्यथा आपल्या पचनास बिघाड होऊ शकतो.
4 नवतपाच्या कडक उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामाच्या रूपाने निघून जातं त्यासाठी दिवसातून किमान 4 लीटर पाणी प्यायला हवं.

5 या दिवसांत प्रचंड उन्हाळ्यात नारळ पाणी, ताक, लस्सी, प्यायल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात तळलेले आणि चमचमीत पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत असते. पण या दिवसात हे खाणे टाळल्यास चांगलंच आहे.

6 जेवणात जास्त मीठ घेऊ नये. फरसाण, शेंगदाणे, तळलेले पापड, चिप्स आणि तळलेले खाद्य पदार्थ घेऊ नये.
7 नवतपाच्या प्रचंड उष्णतेमध्ये मासे, कोंबडी, सी फूड, आणि जास्त गरिष्ठ पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे जास्त घाम येतो आणि पचनाच्या तक्रारी उद्भवतात.

8 नवतपामध्ये जंक फूड जसे पिझ्झा, बर्गर खाणे टाळावे.

9 चहा आणि कॉफी सारख्या पेय टाळणेच सोयीस्कर आहे. कॅफिन आणि इतर पेय आपल्या शरीराच्या उष्णतेला वाढवते. त्याच बरोबर शरीरात निर्जलीकरण म्हणजे पाण्याची कमतरता वाढवते.
10 या दिवसांत सॉस खाणे टाळावं. सॉस मध्ये 350 कॅलोरी आढळते जेणे करून आपल्यामध्ये आळशीपणा येऊ शकतो. काही प्रकारांच्या सॉस मध्ये मीठ आणि MSG (मोनोसोडियम ग्लुटामेंट) आढळतं, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. त्या ऐवजी उन्हाळ्यात पौष्टिक आणि नैसर्गिक अन्नासह ताक, लस्सी, लिंबू-पाणी, शिकंजी, आणि आंब्याचे पन्हे या सारख्या द्रवांचे सेवन करायला हवं.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील ...

वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट..
वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट. सरत्या वयात आहारात अधिक ...

चष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...

चष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...
चष्म्यावर स्क्रॅच पडल्यास नवीन चष्मा खरेदी करण्याची गरज नाही, या सोप्या टिप्स ने स्क्रॅच ...

Benefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, ...

Benefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, जाणून घ्या 7 फायदे..
जगभरातील चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार त्यांचा फायद्यासाठी ...

फळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..

फळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..
फळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच ...

कोरफडाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या, आणि वाचू या ही ...

कोरफडाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या, आणि वाचू या ही माहिती ..
सध्याच्या काळात औषधी आणि सौंदर्य उत्पादन म्हणून कोरफडाची मागणी वाढत आहे, पण हे औषध आणि ...