सर्वात आधी चिकन पूर्णपणे स्वच्छ करावे. चिकन स्वच्छ केल्यानंतर त्यात चिमूटभर हळद आणि एक चमचा आले-लसूण पेस्ट मिक्स करावी. व 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे.आता एका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, कांदा, बडीशेप घाला व परतवून घ्या. आता त्यामध्ये गरम मसाला, मीठ, लाल तिखट, आले-लसूण पेस्ट आणि हळद घाला आणि मसाला परतून घ्या. यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले चिकन त्यात घालावे. चिकन घातल्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यावे. चिकन शिजल्यानंतर आता त्यात आंब्याचा गर आणि टोमॅटो घाला काही वेळ शिजवा. शिजवल्यानंतर वरून कोथिंबीर गार्निश करून गॅस बंद करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते सुक्या मेव्याने किंवा नारळाने सजवून सर्व्ह करू शकता. तर चला तयार आहे आपली मँगो चिकन रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.