चिकन मेयो सँडविच रेसिपी
साहित्य-
सहा -ब्रेड स्लाइस
200-ग्रॅम चिकन ब्रेस्ट
एक टीस्पून आले लसूण पेस्ट
चिमूटभर मिरे पूड
एक टेबलस्पून- तूप
चवीनुसार मीठ
दोन चमचे - मेयोनेज
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे, मीठ आणि मिरपूड, आले-लसूण पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता एका पॅनमध्ये तूप घालावे चिकन तुकडे परतवून घ्यावे. आणि ब्रेडचा साईडचा भाग काढून घ्या. नंतर चिकन आणि मेयोचे मिश्रण ब्रेड स्लाइसवर घालून त्यावर दुसरा स्लाइस ठेवा. नंतर सँडविच त्रिकोणी आकारात कापून घ्या. तर चला तयार आहे आपले चिकन मेयो सँडविच रेसिपी, चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik