चिकन फ्राईड राइस रेसिपी
साहित्य-
वाफवलेला बासमती तांदूळ - चार कप
चिरलेली चिकन - दोन कप
अंडी - चार
व्हेजिटेबल तेल - तीन टेस्पून
चिरलेला कांदा- एक चमचा
सिमला मिरची – एक चमचा
फरसबी - 1 कप
सोया सॉस - ⅓ कप
चिली-गार्लिक सॉस - दोन चमचे
कृती-
सर्वात पहिले पॅनमध्ये तेल गरम करून अंडी घालावी.आत 2 मिनिटे स्क्रॅम्बल होईपर्यंत हळूहळू ढवळत शिजवा.आता कढईत तेल पुन्हा गरम करावे. नंतर कांदा, सिमला मिरची आणि फरसबी घालून 3 ते 4 मिनिटे परतवून घ्यावे. आता त्यात चिकन घालून चांगले परतवून घ्या. आता त्यात भात, सोया सॉस आणि चिली-गार्लिक सॉस घालून 3 ते 4 मिनिटे शिजवा. सर्वकाही चांगले मिक्स करा आणि स्क्रॅम्बल्ड अंडी घालावी. आता कोथिंबीरीने गार्निश करावे. तर चला तयार आहे आपली चिकन फ्राईड राईस रेसीपी, गरम नकीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik