गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 23 डिसेंबर 2024 (13:10 IST)

प्रॉन्स फ्राय: मसालेदार कोळंबी रेसिपी

Prawns Fry Recipe
साहित्य- 
500 ग्रॅम प्रॉन्स
एक मोठा कांदा बारीक चिरलेला 
एक टोमॅटो बारीक चिरलेला 
दोन हिरव्या मिरची तुकडे केलेल्या 
एक छोटा चमचा आले लसूण पेस्ट
एक छोटा चमचा हळद 
दीड चमचा तिखट 
दीड चमचे धणेपूड 
अर्धा छोटा चमचा गरम मसाला 
एक टेबल स्पून व्हिनेगर
एक टेबलस्पून लिंबाचा रस 
एक टेबलस्पून कापलेला कढीपत्ता 
तीन टेबल स्पून तेल  
चवीनुसार मीठ 
 
कृती- 
सर्वात आधी कोळंबी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून सोलून घ्या. आता चांगल्याप्रकारे स्वच्छ करून एक पातेलीत ठेवा. आता त्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड, लिंबाचा रस, व्हिनेगर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता हे वीस मिनिटांकरिता असेच राहू दयावे. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून परतवून घ्यावे. आता कांदा आणि तिखट घालून परतवावे. आता टोमॅटो घालावा. तसेच कढीपत्ता घालून परतवून घ्यावे. आता यामध्ये कोळंबी टाकावे. कोळंबी मध्यम आचेवर पाच मिनिटे शिजू द्या. आता गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपली कोळंबी फ्राय रेसिपी, भात किंवा पराठे सोबत गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik