बटर चिकन खिचडी रेसिपी
साहित्य-
चिकन - 250 ग्रॅम
तांदूळ - 1/2 कप
टोमॅटो प्युरी - 1/2 कप
बटर - 1/2 कप
दही - 1/2 कप
चवीनुसार मीठ
तिखट - 1/2 टीस्पून
कसुरी मेथी - एक चमचा
वेलची- दोन
दालचिनी - एक टीस्पून
हळद - 1/2 टीस्पून
गरम मसाला - 1/2 टीस्पून
लवंग-दोन
आले-लसूण पेस्ट - एक टीस्पून
तमालपत्र - दोन
कांदा - एक बारीक चिरलेला
क्रीम - 1/2 टीस्पून
कृती-
सर्वात आधी चिकन मध्ये दही, मीठ, आले लसूण पेस्ट मिक्स करून चांगल्याप्रकारे मॅरीनेट करावे. आता कुकर मध्ये बटर घालून त्यामध्ये लवंग, तामलपत्र, मीठ इत्यादी साहित्य घालून परतवून घ्यावे. काही वेळानंतर कुकरमध्ये धुतलेले स्वच्छ, टोमॅटो प्यूरी, तिखट आणि हळद घालून पाच मिनिट शिजवून घ्यावे. आता यामध्ये मॅरीनेट चिकन घालून तीन मिनिट शिजू द्यावे. आता कुकरचे झाकण उघडून यामध्ये कसूरी मेथी आमी क्रीम घालावे. तर चला तयार आहे आपली बटर चिकन खिचडी रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik