गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

बेडरूम बनवा रिलॅक्स झोन

बेडरूममध्ये कधीही टीव्ही ठेवू नका. कारण टीव्हीमुळे आरामाच्या वेळी अडचण येऊ शकते. टीव्ही सुरू असतो
तेव्हा संवादाची अन्य माध्यमे निष्क्रिय होतात. घरातल्यांसोबत किंवा जोडीदारासोबत गप्पा न मारता आपण टीव्हीमध्ये संपूर्ण वेळ घालवतो. शिवाय कारण नसताना उशिरापर्यंत टीव्ही बघून जागतो. यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि नंतरही झोप शांत लागत नाही. बर्‍याच जणांना प्रकाशात झोप येत नाही. अशा व्यक्तींनी बेडरूममध्ये गडद रंगाचे पडदे लावावेत. सुटीच्या दिवशी दिवसा रिलॅक्स होण्यासाठीदेखील हे पडदे लावून घेतले तर सूर्याची किरणे आता येऊ शकणार नाहीत आणि मनाला शांत वाटेल.
 
या उलट काही व्यक्तींना झोपताना थोडासा प्रकाश हवा असतो. अशा वेळी नाईट बल्बचा पर्याय निवडावा. हा बल्ब वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो. आपल्याला आवडेल तो रंग निवडून तो खोलीमध्ये लावावा म्हणजे रात्री शांत झोप येईल. झोप नेहमी शांताता असेल तरच येते. आपला मेंदू रिलॅक्स नसेल तर शांत झोप येत नाही. रात्री झोपताना बाथरूमध्ये पाणी टपकण्याचा आवाज येतो आहे का? किंवा अन्य कुठला म्हणजे पंख्याचा वगैरे आवाज येत असेल तर तो येणार नाही यासाठी उपाय करावेत. तसेच दरवाजे आणि खिडक्या बंद करताना देखील आवाज येणार नाहीत यासाठी उपाय करावेत. जोरात वारे आले म्हणजे खिडक्यांची दारे किंवा बाथरूम, टॉयलेटची दारे वाजतात. त्यामुळे रात्री झोपताना ही दारे व्यवस्थित बन्द करून घ्यावीत. यामुळे झोपेत कुठली बाधा निर्माण होणार नाही आणि कुठल्याही कारणाने झोपमोड न होत शांत झोप लागेल.