शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

तिळाची करंजी

साहित्य: अर्धा किलो मैदा, एक पाव साखर, 100 ग्रॅ. तीळ भाजून जाडसर दळलेली, 50 ग्रॅ. किसलेले ओले खोबरे, 50 ग्रॅ. चारोळी, वेलदोडा पूड, तूप.

कृती: साखर बारीक करा. त्यात तीळ, ओले खोबरे, चारोळी, वेलदोडा पूड मिळवा. मैदा गाळून घ्या. एक मोठा चमचा तेलाचे मोहन टाका. व भिजवून घ्या. लहान गोळे घेऊन पुर्‍या लाटून घ्या. वरील सारण भरून करंज्या तयार करा. एका कढईत तूप गरम करून तयार केलेल्या करंज्या मंद आचेवर तळून घ्या.