गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (10:31 IST)

लोहाची कमतरता दूर करणारी काळ्या हरभऱ्याची चविष्ट चाट

काळ्या हरभऱ्याची चाट रेसिपी : लोहाची कमतरता आणि अशक्तपणा आजकाल प्रत्येक व्यक्तीसाठी एक समस्याच बनली आहे. ही समस्या बहुतांश स्त्रियांमध्ये आढळून येते. जर आपल्या शरीरात देखील हिमोग्लोबिनची कमतरता आहे तर दररोज आपल्या आहारात काळ्या हरभऱ्याची चाट समाविष्ट करा. हे स्वादिष्ट असून बऱ्याच पोषक घटकांनी समृद्ध आहे. 
 
हरभऱ्यात लोह मुबलक प्रमाणात आढळतात. जे आपल्या शरीरातील रक्ताच्या कमतरतेला दूर करतं. एवढेच नव्हे तर याचा सेवनाने बद्धकोष्ठतेसारखे त्रास देखील दूर होतात. चला तर मग ही चविष्ट आणि हेल्दी चाट कशी तयार करतात ते जाणून घेऊया.
 
साहित्य - 
1 कप काळे हरभरे 4 ते 5 तास पाण्यात भिजवून ठेवलेले, 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 कप कांदा बारीक चिरलेला, 1 कप बटाटा उकडून चिरलेला, चवीपुरती मीठ, 2 चमचे चाट मसाला, 1 चमचा जिरेपूड, चवीपुरते लिंबाचा रस.
 
कृती -
सर्वप्रथम काळ्या हरभऱ्यांना पाण्याने धुऊन ताज्या पाण्यात उकळवून घ्या. आता या हरभऱ्यांना पाण्यातून काढून थंड करा. वरील सर्व जिन्नस मिसळून चवीनुसार मसाले घालून काळ्या हरभऱ्याची चाट सर्व्ह करा.