शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (11:11 IST)

क्रिस्पी पनीर कॉर्न, चविष्ट डिश घराच्या घरी तयार करा

पाहुणे येत आहे किंवा पटकन काही चविष्ट खाण्याची इच्छा होत असेल तर कितीदा गोंधळ उडतो की आता काय करावं तर अशात पनीर रोल बनवा. अगदी सोपी रेसिपी आहे जी चविष्ट तर आहे, आणि चटकन तयार होणारी आहे. मुले देखील खूप चवीने खातात. 
 
साहित्य -
100 ग्रॅम किसलेले पनीर, 1/2 कप कॉर्न किंवा मक्याचे दाणे, 8 ब्रेड स्लाइस, 2 कांदे बारीक चिरलेले, 1/2 चमचा आलं-लसूण पेस्ट, 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 लहान चमचा काळी मिरपूड, 2 चमचे लिंबाचा रस, 3 चमचे कोर्नफ्लोर, 1 चमचा टोमॅटो सॉस, मीठ चवीप्रमाणे, तळण्यासाठी तेल.   
 
कृती - 
एका पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालून मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर या मध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, काळी मिरपूड आणि लिंबाचा रस घालून 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. नंतर या पॅनमध्ये कॉर्न, पनीर, सॉस आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. तयार मिश्रणाला थंड होऊ द्या. 
 
एका भांड्यात कोर्नफ्लोर, थोडंसं मीठ आणि पाणी मिसळून दाटसर घोळ तयार करा. कढईत तेल घालून मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवा. ब्रेड स्लाइसचे कडे कापून या ब्रेडला लाटून घ्या. या स्लाइस मध्ये तयार केलेले मिश्रण 1 -2 चमचे भरून गोल गुंडाळी करा. या रोलला कोर्नफ्लोरच्या मिश्रणात बुडवून तेलात तळण्यासाठी टाका. सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे सर्व रोल तयार करून तळून घ्या. गरम रोल हिरवी चटणी किंवा सॉस सह सर्व्ह करा.