मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 मे 2018 (15:58 IST)

गोवा बागा बीचवर अल्पवयीन मुलीची छेड, पुण्याचे ९ पर्यटक अटकेत

पर्यटन करायला गेले तरी दुसऱ्याला त्रास देणे सोडत नाहीत. मात्र असा प्रकार पुण्याच्या युवकांच्या अंगाशी आला आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी लहान मुलाला मारहाण करणाऱ्या आणि त्याच्या अल्पवयीन बहिणीचा विनयभंग करणाऱ्या ९ पर्यटकांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. यात पोलिसांना फिर्याद देतांना तक्रारदाराने तक्रारीत म्हटलंय की ते बागा बीचवर असलेल्या शॅकमध्ये बसले होते. त्यांचा मुलगा आणि मुलगी बीचवर फिरत होते. यावेळी ११ युवक येथे आले. त्यांनी मुलीचे न विचारता जवळ जात फोटो काढायला सुरूवात केली. तिच्या भावाने याला आक्षेप घेतला असता या टोळक्याने त्याला मारहाण केली आहे. तर मुलीचा विनयभंग देखील केला आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची रवानगी बालसुधागृहात केली आहे. उर्वरीत आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत.
 
रमेश कांबळे
संकेत भडाळे
कृष्णा पाटील
सत्यम लांबे
अनिकेत गुरव
ह्रषिकेश गुरव
आकाश सुवसकर
सन्नी मोरे
ईश्वर पांगारे